Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलीस विभाग पुणे येथे पोलीस (Police) भरती होणार असून, विधी अधिकारी पदांच्या एकुण 04 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे . यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असून हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

विधी अधिकारी या पदासाठी भरती होणार असून, या नोकरीसाठीची वयोमर्यादा ही 40 वर्ष इतकी आहे तर एकूण चार जागांसाठी ही भरती होणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता ही Law Degree असणे आवश्यक आहे. तर यासाठीचे कामाचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड आहे.

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड  पुणे – 411019 या पत्त्यावर अर्जदार आपले अर्ज पाठवावेत. तर अर्ज पाठविण्याची शेवटची मुदत ही 30 सप्टेंबर 2022 आहे. यासाठीच ऑफलाईन पद्धतीने करावा आणि अधिक माहितीसाठी pcpc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

अटी व शर्ती

विधी अधिकारी या पदाची नेमणूक पूर्णत: कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी/कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.

सदर नेमणूक हया करार नियुक्ती पध्दतीने प्रथमत: 11 महिन्यांसाठी करण्यात येतील. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त 3 वेळा 11महिन्याकरीता) वाढविता येईल.

3 वेळा मुदत दिल्यानंतरही अशा उमेदवारांची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे सक्षम प्राधिका-याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्च: निवढ प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.

निवड केलेला उमेदवार 11 महिन्याच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम/व्यवसाय नियुक्ती प्राधिका-याच्या लेखी परवानगीशिवाय करु शकणार नाही. जर खाजगी व्यवसाय सुरु ठेवला असेल व तसे उमेदवारांची नियुक्ती रद्य करण्यांत येईल. तसेच अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

उमेदवारांची लेखी परिक्षा 50 गुणांची व तोंडी परिक्षा 25 गुणांची घेण्यात येईल. नियक्ती देणेसाठी किमान 60 % गुण असणे आवश्यक आहे. लेखी परिक्षा व तोंडी परिक्षेबाबतचा दिनांक उमेदवारांना पत्राव्दारे व या कार्यालयाच्या संकेतस्थळाद्वारे कळवियांत येईल. उमेदवारांना मुलाखतीस, कागदपत्र तपासणीस आलेवर कोणताही प्रवासखर्च देण्यात येणार नाही.