Maharashtra Jobs : पुणे पोलिस विभाग अंतर्गत एकूण 795 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 720 जागा आहेत, तसेच चालक पदाच्या 75 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

पुणे (Pune) पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता – 12th Pass आहे. तर नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे इतके आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे इतका आहे. यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे. तर मागास प्रवर्गासाठी रु. 350 /- इतका आकारला आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://punepolice.gov.in/ ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.