Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) राज्यात 75 हजार शिक्षकांची (Teachers) मेगा भारी करण्याची घोषणा महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केली आहे. शनिवारी सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी 75 हजारांहून अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. आणि ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरली जाणार आहेत. यावर कॅबिनेट बैठकीतही चर्चाही झाली आहे. असे दीपक केसरकर म्हंटले आहेत.

शिक्षणाची कमतरता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिले आहे.

यासाठी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्य मंडळात झालीअसून, या बैठकीत केसरकर यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांतील कामाचा आढावा घेतला.

या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या 10-12 वर्षांपासून शिक्षक (Teachers) भरती बंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. तसेच

सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत 31 हजार 572 शिक्षकांची पदं रिक्त असून अनुदानीत खाजगी शाळांमध्ये 25 हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत.

शिक्षक नसतील तर मग सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? असा प्रश्न भाजप समर्थीत आमदार नागो गाणार यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरच राज्यात शिक्षक भरती केली जाईल, यामुळे अनेक तरुणाचा बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा सुटेल.