Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) रेल्वे (Railway) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून, अनेक तरुणांसाठी ही एक सुवाईंसंधी ठरणार आहे. दरम्यान, 3000 हुन अधिक पदासाठी ही भरती होणार आहे.

रेल्वे विभागाद्वारे अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी भरती सुरू झाली असून, लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.

रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडसाठी ही भरती होणार असून, यासाठी 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर अर्जदाराने अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. दरम्यान यासाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांसाठी आहे संधी

हावडा डिवीजन – 659 पद
लिलुआ ऑफिस- 612 पद
सियालदह डिवीजन – 440 पद
कांचरापाडा ऑफिस – 187 पद
मालदा डिवीजन – 138 पद
आसनसोल ऑफिस – 412 पद
जमालपुर ऑफिस – 667 पद

कोण करू शकतो अर्ज

यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत. हेच उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील.

दरम्यान यासाठीच शुल्क हा ओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये इतका असेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.अधिक माहितसाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.