Maharashtra Jobs : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (Job) होणार असून, लवकरच यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

हे पण वाचा :- फायदेशीर ठरते डिजिलॉकर, ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय (DHMS) अंतर्गत डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, एपिडर्मियोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, बालरोगतज्ञ-01 आणि सामान्य शल्यचिकित्सक-02, ऑर्थोपेडिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत शल्यचिकित्सक पदांच्या एकुण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय येथे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, एपिडर्मियोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, बालरोगतज्ञ-01 आणि सामान्य शल्यचिकित्सक-02, ऑर्थोपेडिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत शल्यचिकित्सक या पदासाठी भरती होणार आहे. एकूण 130 जागांसाठी ही भरती होणार असून पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेची आहे. (Maharashtra Jobs)

यासाठीचे नोकरी ठिकाण हे सिल्वासा आहे तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. बालरोगतज्ञ-01 आणि सामान्य शल्यचिकित्सक-02, ऑर्थोपेडिक सर्जन – 45 वर्षे
वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत शल्यचिकित्सक – 35 वर्षे

दरम्यान, यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे तर वैद्यकीय महाविद्यालय पदांकरिता – NAMO वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था,SSR कॉलेज कॅम्पस, सायली सिल्वासा-396230 या पत्त्यावर अर्ज करावा. तसेच, DMHS पदांकरिता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230 या पत्यावर अर्ज करावा.

हे पण वाचा :- स्वस्तात मस्त, ही आहे जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर..

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022 आहे तर अधिक माहितसाठी vbch.dnh.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचे विहित नमुने www.dnh.gov.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

हे पण वाचा :- दमदार फीचर्ससह लवकरच येणार Hyundai ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार