Maharashtra Jobs :(Maharashtra Jobs) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे रिक्त पदांसाठी भरती होणार असून, योग्य उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अनेक बेरोजगार तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असून, पुढील प्रमाणे यासाठी अर्ज करावा.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 रिक्त जागा (Recruitment) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल, जसे की प्रेलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.

यापदासाठीची शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे आहे 

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

यासाठी अर्ज करण्याचा शुल्क हा General/ EWS/ OBC या कॅटेगिरीसाठी रु. 750/- इतका आहे तर या पदासाठीची वयोमर्यादा वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे इतकी आहे. दरम्यान, यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून हा अर्ज करण्याची मुदत ही 22 सप्टेंबर 2022 पासून सूर झाली आहे तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – sbi.co.in याला भेट द्यावी.

या पद्धतीने करा अर्ज

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
22 सप्टेंबर 2022 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.