Maharashtra Jobs :(Maharashtra Jobs) पोलीस भरतीसाठी वाट बघणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. कारण आता राज्यात एकूण 20 हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. गेली दोन वर्ष रखडलेली ही पोलीस भरती प्रक्रिया अखेर होणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी दिली आहे.

दरम्यान या भरतीमुळे 2020 आणि 2021 या वर्षातील रिक्त पदे एकत्रितरित्या भरले जातील आणि यामुळे पद भरती यंत्रणेवरील तानसुद्धा कमी होईल. यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एकूण 20 हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनामुळे सर्वच यंत्रणा ठप्प झाल्या होत्या यामुळेच गेली दोन वर्ष झाले ही भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच ही पोलीस (Police) भरती लवकरच होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Police Recruitment 2022

दरम्यान, पोलीस (Police) भरती संदर्भात एक जाहीरात निघाली आहे. ही जाहीरात साडेसात ते आठ हजार पदांसाठी आहे. नव्या भरतीबाबतही लवकरच जाहीरात काढली जाणार आहे..

त्यामुळे राज्यातील तरुणांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, राज्यातील अधिकाधिक तरुण या भरतीसाठी प्रयत्न करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण चांगले शिक्षित आहेत. अशा वेळी त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेकार असल्याचे पाहायला मिळते.

अशा वेळी जर पोलीस भरती निघाली तर अनेकांच्या हाताला काम आणि कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही भरती दिलासादायक असेल असे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार असतानाच पोलीस भरतीसंदर्भात हालचाली झाल्या होत्या.
मात्र, नेमक्या वेळी राज्यावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले. परिणामी सर्व यंत्रणाच ठप्प झाली किंवा त्याला मर्यादा आल्या. त्यामुळे पोलीस भरती रखडली. कोरोना महामारी आली नसती तर राज्यात या आधीच पोलीस भरती झाली असते, असेही फडणवीस म्हणाले.

भरतीचे संभाव्य नियोजन आणि टप्पे (Recruitment)

पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर 2022 मध्ये होणार.

2021 मध्ये पोलिस शिपाई 10 हजार 404 तर चालक एक हजार 401 आणि सशस्त्र पेलिस शिपायांची 722 पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता.

2019 मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा 2020 मधील रिक्त पदांची भरती होईल.
ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी 2021 मधील रिक्तपदांची भरती होईल