Maharashtra Jobs : पुणे महानगरपालिका येथे रिक्त पदांसाठी (Job) भरती होणार असून, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) येथे समुपदेशक, समूहसंघटिका, सहाय्यक, प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक, समन्वयक, स्वयंसेवक, मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, मशीन दुरुस्तीकार पदांच्या एकूण 229 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 आहे.

पुणे महानगरपालिका येथे समुपदेशक, समूहसंघटिका, सहाय्यक, प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक, समन्वयक, स्वयंसेवक, मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, मशीन दुरुस्तीकार या पदांसाठी भरती होणार असून, एकूण 229 जागांसाठी भरती होणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरी ठिकाण हे पुणे आहे. यासाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.

वयोमर्यादा –
समाज विकास विभाग – 58 वर्षे
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, अर्जाची पद्धती ही सक्षम आहे तर, एम.एस.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज सुरू होण्याची तारीख – 31st ऑक्टोबर 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in ला भेट द्यावी.

अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट 30 किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट 40 उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्ॉमिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचे एम.एस.सी.आय.टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

वरील पदांकरिता अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जाचा नमुना www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवार 31st ऑक्टोबर 2022 पासून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 आहे.