Maharashtra Jobs : IBPS द्वारे एकूण 710 रिक्त पद भरतीची घोषणा केली आहे. IBPS ने विविध क्षेत्रांसाठी IBPS SO च्या रिक्त जागांसाठी हि नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. अधिकारी (स्केल-I), कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I), राजभाषा अधिकारी (स्केल I), कायदा अधिकारी (स्केल I), एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल I) आणि मार्केटिंग अधिकारी (स्केल I) इत्यादी पदांसाठी ही भरती होत आहे. (Recruitment)

IBPS (IBPS) द्वारे I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी या पदाच्या एकूण 710 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

तर यासाठीचा अर्ज शुल्क हा पुढील प्रमाणे आहे –
SC/ST/PWBD – Rs. 175/- (inclusive of GST)
for all others – Rs. 850 /- (inclusive of GST)

तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. दरम्यान, अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ibps.in ला भेट द्यावी.