Maharashtra Jobs : चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट अंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी (Chandrapur Forest Academy) ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्लंबर, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन, रिसेप्शनिस्ट, हॉस्टेल केअरटेकर, ड्रायव्हर, निवृत्त रेंजर सर्व्हेअर, जिम ट्रेनर, ऑफिस असिस्टंट, लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर, क्लासरूम अटेंडंट या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण चंद्रपूर हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर येथील प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन विभागाच्या चंद्रपूर वन अकादमीचे कार्यालय हा आहे.

अर्जदाराने ई-मेल पत्ता – chandrama.cfa@gmail.com वरती ई-मेल करावा. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.chandrapurforestacademy.org ला भेट द्यावी.

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेद्वांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2022 आहे.