Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महावितरण विभागाद्वारे अनेक रिक्त पदांसाठी भरती होणार असून, यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कोल्हापूर (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

महावितरण विभागांमध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार असून एकूण 178 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. दरम्यान यासाठीचे नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर (Kolhapur) आहे.

उमेद्वाराने 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत यासाठी अर्ज करावेत. दरम्यान यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून वेबसाइटद्वारे हा अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 5 ऑक्टोबर 2022 दरम्यान करता येतील.

महावितरण भरती 2022 ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.

महावितरण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिका व ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डवर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करुनच माहिती भरावी.

तसेच, एस. एस. सी. गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र (चार ही सेमिस्टरची) साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

शिकाऊ उमेदवाराची सही, पालकाची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस.एस.सी.मार्क, आयटीआय मार्क, ही माहिती अचूक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.