Maharashtra Jobs : पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका येथे एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

पुणे परिमंडळांतर्गत पुणे (Pune) महानगरपालिका येथे माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, वसतिगृह वॉर्डन, खरेदी व स्टोअर व्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, मुख्य लेखापाल, रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक, विद्यार्थी समुपदेशक, जैव- वैद्यकीय अभियंता, ECG तंत्रज्ञ, श्रवणयंत्र तंत्रज्ञ, अपवर्तनवादी, लघुटंकलेखक, नळ कारागीर या पदांसाठी भरती होणार असून एकूण यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –

खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून पुढील पत्त्यावर मुलाखती होणार आहेत – भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे तर 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29, 30 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) मुलाखत प्रक्रिया होतील.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in ला भेट द्यावी.

फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
अनुभव प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)