Maharashtra Jobs : केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे एकूण 20+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Recruitment)

केंद्रीय सरकार आरोग्य योजना (Central Government Health Scheme) नागपूर येथे मल्टी-टास्किंग स्टाफ, GDMO/ स्पेशालिस्ट, JHAA (लोअर डिव्हिजन क्लर्क), नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) या पदांच्या रिक्त जागांसाठी भरती होणार असून, एकूण 20+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
GDMO/ स्पेशालिस्ट – 70 वर्षे
इतर पदांसाठी – 65 वर्षे

तर यासाठी अर्ज पद्धती ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर पुढील पत्त्यावर अर्ज करावा- अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर – 440006, दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – cghs.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी स्वतःची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
नियुक्ती स्वीकारल्यानंतर नियुक्तीच्या ठिकाणी सामील होण्यासाठी नियुक्तीला कोणत्याही टीएचा अधिकार नाही.
शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी आणि मुलाखतीची तारीख CGHS वेबसाइट www.cghs.gov.in वर अपलोड केली जाईल.