Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर (Mahavitaran Nagpur) येथे वीजतंत्री, तारतंत्री व कोपा या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, एकूण 203 जागांसाठी ही होणार आहे. यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.
यासाठी वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षे इतकी आहे यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in ला भेट द्या.
महत्वाची कागदपत्रे
एस.एस.सी. गुणपत्रिकेची मूळप्रत
आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत.
आधारकार्ड
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र
इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत