Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत उस्मानाबाद येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 68 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट या पदांसाठी भरती (Recruitment) होणार आहे.

यासाठी एकूण 68 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तसेच यासाठीचे नोकरीचे ठिकाण हे
उस्मानाबाद आहे.
यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग -43 वर्षे

यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क Rs. 150/- आहे तर राखीव प्रवर्गासाठी Rs. 100/- इतका आहे. अर्जदाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा आणि यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होईल.

दरम्यान, अर्जदाराने – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्र. 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद, उस्मानाबाद या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in ला भेट द्यावी.

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 (5.00 वाजेपर्यंत) आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती/ लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
मुलाखती/ लेखी परीक्षेला उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.