Maharashtra Jobs : अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक या पदाच्या एकूण 321 जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे-

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 18 ते 28 वर्षे
सहायक सुरक्षा अधिकारी – 18 ते 27 वर्षे
सुरक्षा रक्षक – 18 ते 27 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क पुढील प्रमाणे –

कनिष्ठ अनुवाद अधिकारी – रु. 200/-
सहायक सुरक्षा अधिकारी – रु. 200/-
सुरक्षा रक्षक – रु. 100/-

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची असून, अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2022 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – dae.gov.in ला भेट द्यावी.

How To Apply For DAE Jobs 2022

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील, याची दक्षता घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.