Maharashtra Jobs : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे रिक्त पदांसाठी भरती होणार असून, योग्य उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Recruitment)
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदासाठी भरती होणार असून. ही भरती एकूण 540 जागांसाठी होणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आवश्यक आहे.
यासाठी वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे इतकी आहे तर यासाठीअर्ज शुल्क – रु. 100/- इतका आहे. तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. दरम्यान, अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022 इतकी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in ला द्यावी.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NOTICE BOARD पर्यायावर जा.
आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.