Maharashtra Jobs : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथे एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच वैज्ञानिक सहाय्यक (बी) (डिझाइन) या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे. व इतर पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

हे पण वाचा :- भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती, असा करा अर्ज 

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई (Mumbai) येथे प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- B प्रकल्प, प्रयोगशाळा सहाय्यक- B, अभियंता प्रशिक्षणार्थी (आयटी), तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल), लिपिक प्रशिक्षणार्थी, वैज्ञानिक सहाय्यक (B) (डिझाइन) या पदांसाठी एकूण 09 जागांसाठी भरती होणार असून यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरी ठिकाण मुंबई हे आहे तर अर्ज पद्धती ऑनलाईन वैज्ञानिक सहाय्यक (B) (डिझाइन) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 नोव्हेंबर 2022 आहे तर यासाठीची निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे होणार असून मुलाखतीचा पत्ता – HBCSE , मानखुर्द, मुंबई – 400008 हा आहे. तर मुलाखतीची तारीख – 11, 15, 16, 17, 18 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : www.hbcse.tifr.res.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- महावितरण मध्ये ‘या’ पदांची नवीन भरती, असा करा अर्ज.. 

वैज्ञानिक सहाय्यक (B) (डिझाइन) या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना https://www.hbcse.tifr.res.in/advt/ वेबसाईट वर जाहीर केलेला आहे. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- मुंबई रेल्वे पोलीस विभागात होणार बंपर भरती, असा करा अर्ज..