Maharashtra Jobs : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)
एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी या पदांच्या एकूण 27 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीच्या शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण दिल्ली, मुंबई, कोलकाता हे आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर यासाठी अर्ज शुल्क रु. 1500/- इतका आहे.
यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, पुढील पत्त्यावर मुलाखती होणार आहेत-
दिल्ली: दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, जोर बाग, नवी दिल्ली-110003.
कोलकाता: Air India Engineering Services Ltd., APU केंद्र, कार्मिक विभाग, पहिला मजला, नवीन तांत्रिक क्षेत्र, DUM DUM, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700052
मुंबई: AIESL, कार्मिक विभाग नवीन अभियांत्रिकी संकुल, सहार, विलेपार्ले (पूर्व), बामनवाडा जवळ, सिगारेट कारखाना, मुंबई-400099
या मुलाखती दिल्ली – 14 नोव्हेंबर 2022 होणार आहे तर मुंबई येथे – 21 नोव्हेंबर 2022 ला मुलाखती होणार आहेत. तर कोलकाता येथे – 28 नोव्हेंबर 2022 ला मुलाखती होणार आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.aiesl.in ला भेट द्यावी.
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
मुलाखतीची तारीख 14, 21 & 28 नोव्हेंबर 2022 आहे.