Maharashtra Jobs : WAPCOS लिमिटेड, पुणे अंतर्गत एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

WAPCOS लिमिटेड, पुणे (Pune) अंतर्गत टीम लीडर, सिव्हिल बांधकाम विशेषज्ञ, हायड्रोलिक डिझायनर तज्ञ, क्वांटिटी सर्व्हेयर, NRW तज्ञ, GIS तज्ञ, खरेदी तज्ञ, बांधकाम पर्यवेक्षक, संगणक ऑपरेटर / टायपिस्ट या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य कर्मचारी सांस्कृतिक संस्था, अल्पा बचत संकुल, पुणे हा आहे तर मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.wapcos.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखतीसाठी अर्जदारांनी सर्व आवश्यक तपशीलांसह योग्यरित्या भरलेले अर्ज आणणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या भरलेल्या अर्जासह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर वैयक्तिकरित्या उपस्थित रहावे.
तपशील आणि प्रोफॉर्मासाठी आमच्या www.wapcos.co.in वेबसाइटला भेट द्या
मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
मुलाखत 27 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.