Maharashtra Jobs : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) मिरज (Miraj) येथे सहायक प्राध्यापक या पदासाठी भरती होणार असून, एकूण 32 रिक्त जागासाठी भरती होणार आहे. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
यासाठीचे नोकरीचे ठिकाण मिरज, जि. सांगली हे आहे. तर यासाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष इतका आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्ष आहे. दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय महाविद्यालय मिरज, महाविद्यालय परिषद सभागृह हा आहे तर मुलाखतीची तारीख 16 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in ला भेट द्यावी.
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
सदर पदांकरिता www.gmcmiraj.edu.in वेबसाइट उपलब्ध आहे.
उमेदवार 16 नोव्हेंबर 2022 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.