Maharashtra Jobs : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती होणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे तर यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता कायमस्वरूपी कॅम्पस येथे स्थित S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – 441108 हा असून, 09 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखती होणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in ला भेट द्यावी. (Recruitment)
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवारांना संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि वॉक-इन मुलाखतीच्या तारखेला सर्व संबंधित कागदपत्रांसह भरलेला फॉर्म सोबत आणावा लागेल.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळी मुलाखतीला उपस्थित राहावे.
उमेदवारांकडे किमान एक कार्यरत ईमेल (केवळ जीमेल) आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे जे संप्रेषणासाठी संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान वापरले जाईल,
मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.