Maharashtra Jobs : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR – NEERI) येथे “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.neeri.res.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया ऑनलाईन मुलाखती द्वारे होणार आहे.
ऑफलाइन मुलाखतीच्या बाबतीत, मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
मुलाखतीची तारीख स्वतंत्रपणे ई-मेलद्वारे सूचित केली जाईल.
अंतिम सत्र आणि निकालाची प्रतीक्षा असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी नाही.
कायमस्वरूपी पदासाठी कोणताही दावा मान्य केला जाणार नाही.
निवडलेल्या उमेदवारांनी नियुक्तीचे ऑफर लेटर मिळाल्याच्या तारखेपासून, वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी इत्यादी पूर्व-नियुक्ती औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या वेळेत सामील होणे अपेक्षित.