Maharashtra Jobs : नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत एकूण 405 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

नॉर्दन कोलफील्ड (NCL) अंतर्गत मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी, तांत्रिक आणि पर्यवेक्षी सर्वेक्षक या पदांची रिक्त जागा भरली जाणार आहे. दरम्यान, यासाठी एकूण 405 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे इतकी आहे. SC/ ST/ PwED/ ESM/ विभागीय उमेदवार यांच्यासाठी अर्ज शुल्क आकारला जाणार नाही. तर इतर उमेदवार यांच्यासाठी रु.1180/- इतका आकारला जाईल. दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.