Maharashtra Jobs : प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत एकूण 530 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.(Recruitment)

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) येथे प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड या पदांच्या एकूण 530 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –

प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर – 56 वर्षे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड – 56 वर्षे

दरम्यान, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सुरु होण्याची तारीख 1 ऑक्टोबर 2022 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.cdac.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. उमेदवाराने सर्व पात्रता मापदंड वाचले पाहिजेत आणि ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.

उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहील. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा. ऑनलाइन अर्जातील सर्व तपशील भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

C-DAC वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान इंटरनेट बँकिंग/डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंटद्वारे आवश्यक अर्ज शुल्क भरावे लागेल. व्यवहाराचा तपशील स्वतःच्या नोंदींसाठी छापून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे.