Maharashtra Jobs : स्टेट बँक ऑफ इंडिया येथे रिक्त पदांसाठी भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयचा असून, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती अनुसार CBO पदाच्या एकूण 1422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी महाराष्ट्रात एकूण 212 पदांची भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. पात्र उमेदवार SBI सर्कल बेस्ड ऑफिसर व्हेकन्सी (Job) 2022 साठी 18 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज सादर करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अधिकारी (CBO) या पदासाठी भरती होणार आहे. एकूण 1422 जागांसाठी ही भरती होणार असून,उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे असून, यासाठीचा अर्ज शुल्क General/ EWS/ OBC – रु. 750/- आणि SC/ ST/ PWD – Nil आहे.
यासाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन आहे. 18 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज करण्याची मुदत सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2022.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
18 ऑक्टोबर 2022 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.