Maharashtra Jobs : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकुण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत डाटा प्रोटेक्शन ऑफिसर, सहाय्यक डेटा संरक्षण अधिकारी, सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट, उपव्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आहेत.

दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. यासाठी अर्ज शुल्क रु. 750/- इतका आकारला जाणार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
डाटा प्रोटेक्शन ऑफिसर – 40 ते 55 वर्षे
सहाय्यक डेटा संरक्षण अधिकारी – 35 ते 45 वर्षे
सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट – 25 ते 35 वर्षे
कार्यकारी – 35 वर्षे
इतर पदे – 35 वर्षे

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – sbi.co.in ला भेट द्यावी.

उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
वरील पदांसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.