Maharashtra Jobs : पिंपरी चिंचवड पोलिस विभाग अंतर्गत एकूण 216 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

पिंपरी चिंचवड पोलिस विभाग (Police) अंतर्गत पोलीस शिपाई या पदांच्या रिक्त जागा भरल्या जात असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही – 12th Pass आहे. दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही खुल्या वर्गासाठी 18 ते 28 वर्षे इतकी आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे. यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या वर्गासाठी रु. 450 /- इतका आहे. तर मागास वर्गासाठी रु. 350 /- इतका आकाराला जाणार आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – pcpc.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.