Maharashtra Jobs : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

कोंकण कृषी विद्यापीठात (Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith) यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, प्रशासकीय सहायक या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार असून, एकूण 09 जागासाठी ही भरती होणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा – 38 वर्षे इतकी आहे तर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्जदाराने, NAHEP – IDP कार्यालय, DBSKKV, दापोली या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022 ही आहे तर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्जदाराने मुलाखतीसाठी दिलेल्या NAHEP – IDP कार्यालय, DBSKKV, दापोली या पाट्यावर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट dbskkv.org ला भेट द्यावी.

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2022 (9.00 वाजेपर्यंत) आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Selection Process For DBSKKV Jobs 2022

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळी मुलाखतीला उपस्थित राहावे.
उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
उमेदवारांनी मुलाखतीला 14 नोव्हेंबर 200 ला सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहावे.