Maharashtra Jobs : जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

जिल्हा रुग्णालय नांदेड (Nanded) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नांदेड हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 58 वर्षे इतकी आहे. तर निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. या मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड हा आहे. तर मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – nanded.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. थेट मुलाखातीकरीता हजर उमेदवारांची संख्या जास्त असल्यास रिक्त पदांच्या संख्येनुसार 1:5 प्रमाणे गुणानुक्रमे प्रथम असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलविणेत येईल.अर्जाचा नमुना व जाहिरात www.nanded.gov.in व www.maha-arogya.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे.

मुलाखतीबाबत सुचना तसेच पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचे स्थळ, दिनांक व वेळ www.nanded.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2022 आहे.