Maharashtra Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25, 29, 30 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, सल्लागार, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बालरोग) , समन्वय वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ग्रेड-II, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक (ग्रेड-I), विशेष शिक्षक (ग्रेड- II), व्यावसायिक समुपदेशक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 38 वर्ष इतकी आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क हा सहाय्यक प्राध्यापक, सल्लागार, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बालरोग) , समन्वय वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी रु. 684/- इतका आकारला जाणार आहे. तर ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ग्रेड-II, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक (ग्रेड-I), विशेष शिक्षक (ग्रेड- II), व्यावसायिक समुपदेशक या पदांसाठी रु.177/ इतका आहे.

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीचा पत्ता – बोर्ड रूम, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबईच्या तळमजल्यावरील डीनच्या चेंबरच्या पुढे – 400008 हा आहे. तर मुलाखतीची तारीख 25, 29, 30 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. अर्जदारांनी वरील तपशिलाप्रमाणे सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि त्याच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतींसह वॉक-इन मुलाखत कार्यक्रमास उपस्थित राहावे. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे . मुलाखतीची तारीख 25, 29, 30 नोव्हेंबर 2022 आहे.