Maharashtra Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत सहायक प्राध्यापक या रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
सर्वसाधारण उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 4 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क हा रु. 580/- + (18% G.S.T) इतका आकारला जाणार असून, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठीअर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 ही आहे.

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022 हा आहे.

मुलाखतीची तारीख ही 15 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in ला भेट द्यावी.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.