Maharashtra Jobs : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय (DMHS) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – NAMO वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, sSR कॉलेज कॅम्पस, सायली, सिल्वासा-396230 हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – vbch.dnh.nic.in ला भेट द्या.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचे स्वरूप www.dnh.gov किंवा www.vbch.dnh. nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
देय तारखेनंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2022 आहे.