Maharashtra Jobs : कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक (Nashik) येथे जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O&G विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, लॅब तंत्रज्ञ, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, सहायक मेकॅनिक, फिटर, केमिकल मजदूर, वाल्वमन, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ड्राफ्ट्समन (ग्रेड II), क्लिनर, सुतार, चित्रकार, मजदूर / मदतनीस या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण देवळाली (नाशिक) हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही
जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O&G विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक यांसाठी 23 ते 35 वर्षे इतकी आहे. तर इतर पदांसाठी 21 ते 30 वर्षे इतकी आहे.

यासाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे आहे –
UR /EWS / OBC – रु.700/-
महिला / SC / ST / PH / ट्रान्सजेंडर – रु.350/-
माजी सेवा पुरुष / विभागीय उमेदवार (UR / OBC) – रु.400/-

दरम्यान, यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येणार असून, अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, कनॉट रोड, देवळाली कॅम्प (नाशिक) 422401 हा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – deolali.cantt.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीकरिता deolali.cantt.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.