Maharashtra Jobs : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) येथे क्षेत्र अभियंता, क्षेत्र पर्यवेक्षक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी एकूण 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीचाअर्ज शुल्क हा क्षेत्र अभियंता या पदासाठी रु 400/- इतका आकारला जाणार असून, क्षेत्र पर्यवेक्षक या पदासाठी रु 300/- इतका आकारला जाणार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही 29 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची असून, अर्ज सुरु होण्याची तारीख ही 21 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in ला भेट द्यावी.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.powergrid.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
वेबसाइटवर त्यांचे अर्ज नोंदणी आणि सबमिट करण्यापूर्वी, उमेदवाराकडे वैध सेल्फ ई-मेल आयडी, पर्यायी ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.