Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण 280 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- IBPS SO भरती अंतर्गत रिक्त पदांची होणार भरती, आजच करा अर्ज.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत हृदयरोगतज्ज्ञ (सुपर स्पेशालिस्ट), नेफ्रोलॉजिस्ट (सुपर स्पेशालिस्ट), स्त्रीरोगतज्ञ (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), सर्जन (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ), भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता,

ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक ई- सुश्रुत, आहारतज्ञ, समुपदेशक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक डीईओ, लेखापाल, पॅरा मेडिकल वर्कर, एमटीएस (मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक), दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, दंत स्वच्छता, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, बीएसयू तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, STS (वरिष्ठ उपचार एसटी पर्यवेक्षक), STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक), स्टाफ नर्स या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- टाटा मेमोरियल सेंटर (TMC) येथे नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची आज शेवटची मुदत..

दरम्यान, ही भरती एकूण 280 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे
ठिकाण ठाणे हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, अतिविशेषतज्ञ – 65 वर्षे
इतर पदे (परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता) – 65 वर्षे
MBBS, स्पेशालिस्ट – 70 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु. 300/- इतका आहे. तर राखीव प्रवर्गासाठी रु. 200/- इतका आकारला जाणार आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची आहे.

दरम्यान, यासाठीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता -जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे हा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

हे पण वाचा :- NHM हिंगोली येथे नोकरीची उत्तम संधी..