Maharashtra Jobs : श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर2022 आहे. (Recruitment)

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे सहाय्यक प्राध्यापक, प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण धुळे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी – 40 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 45 वर्षे

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क रु. 250/- इतका आकारला जाणार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

यासाठी मुलाखतीची तारीख ही सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 29 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर इतर पदांकरिता 30 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – sbhgmcdhule.org ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचे विहित नमुने अधिकृत वेबसाइट dhule.gov.in वर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.