Maharashtra Jobs : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे. (Recruitment)

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (AIT) पुणे येथे रजिस्ट्रार, चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक या पदांच्य रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक या पदांसाठी ऑफलाईन आहे. तर रजिस्ट्रार या पदांसाठी ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करता येणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015 हा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार) ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : www.aitpune.com ला भेट द्यावी.

या भरतीकरिता रजिस्ट्रार पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
तसेच इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.