Maharashtra Jobs : बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत 551 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- खुशखबर, UPSC अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची होणार भरती.. 

बँक ऑफ महाराष्ट्र,(BOM) पुणे येथे AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बँकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे (Pune) हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
AGM बोर्ड सचिव आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स – 45 वर्षे
AGM डिजिटल बँकिंग- 45 वर्षे
AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) – 45 वर्षे
मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
जनरलिस्ट ऑफिसर III – 25 ते 35 वर्षे
जनरलिस्ट ऑफिसर II – 25 ते 38 वर्षे
फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर – 26 ते 32 वर्षे

हे पण वाचा :- SEEPZ अंतर्गत ‘या’ पदांची होणार भरती, असा करा अर्ज.. 

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा UR/ EWS/ OBC यांसाठी रु. 1,180/- इतका आहे. तर SC/ ST/ PwBD साठी रु. 118/- इतका आकारला जाणार आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितसाठी अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in ला भेट द्यावी.

वरील भारतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज 06 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
अर्जदारांनी भरतीसाठी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी.

हे पण वाचा :- आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (AIT) पुणे येथे नोकरीची उत्तम संधी..