Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारी बँकेमध्ये (Bank) तब्बल 41 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळेच 41 हजाराहून अधिक रिक्त असलेल्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, 41,177 पदे अद्यापही रिक्त आहेत.

देशातील एकूण 12 बँकेमध्ये 40 हजाराधिहून अधिक पदे रिक्त आहेत तर दुसरीकडे देशातील तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अश्यात ही भरती अनेक तरुणांसाठी फायद्याची ठरणार आहे.

या सरकारी बँकांमध्ये बँक अकारी, लिपीक आणि सह कर्मचाऱ्यांच्या हजारो पदांसाठी भरती होणार आहे.

एसबीआई (SBI) मध्ये सध्या 8544 पदे रिक्त आहेत. तर एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी 3423 पदे अधिकारी पदाची आणि 5121 पदे लिपीक स्तरावरची आहेत. यासोबतच पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) सुद्धा 6743 पदे रिक्त आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)ही तिसऱ्या स्थानी असून या बँकेत 6295६ पदे रिक्त आहेत. यापाठोपाठ इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत 5112 पदे रिक्त आहेत. बँक ऑफ इंडियात (BOI)रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या 4,848 आहे.

कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?

Bank Officer Vacancy – 17,380
Bank Clerk Vacancy – 13,340
All staff – 10,457

7.71 लाख कर्मचारी सरकारी बँकांत

बँकेमध्ये एकूण 26% टक्के अधिकाऱ्यांची संख्या वाढली असून लिपिक आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यांनी घटली आहे. सध्या 1000 ग्राहकांमागे एक कर्मचारी सरकारी बँकांत आहे. तर खासगी बँकांत 100 ते 600 ग्राहकांमध्ये 1 कर्मचारी आहे. सरकारी बँकांतील कर्मचारी टंचाईची कल्पना येत आहे.