Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) पुणे महानगर पालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका (Mahanagara Palika) येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती होणार असून, अनेक बेरोजगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

हे पण वाचा :- भारत पेट्रोलियममध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, रिक्त पदांसाठी होणार भरती

पुणे परिमंडळांतर्गत पुणे (Pune) महानगरपालिका येथे बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

पुणे महानगर पालिका येथे बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी एकूण 27 जागा भरल्या जाणार असून पदाच्या अवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.

यासाठी नोकरी ठिकाण हे पुणे आहे तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
बालरोगतज्ञ – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

हे पण वाचा :- खुशखबर, बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची संधी, असा करा अर्ज

स्टाफ नर्स
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, यासाठीच अर्ज शुल्क रु. 150/- इतका आकारला जाणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ही आहे. यासाठी अर्ज कारण्याची मुदत 11 ऑक्टोबर 2022 सुरु होणार आहे तर 19 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. अधिक माहितसाठी अधिकृत वेबसाईट www.pmc.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.
खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.

तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.
सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

हे पण वाचा :- स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी होतीये भरती

महत्वाची कागदपत्रे

वयाचा पुरावा
पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)
शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
निवासी पुरावा
जातीचे प्रमाणपत्र
उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो

हे पण वाचा :- : फक्त दहा हजारात बुक करा ‘ही’ इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये देते जबरदस्त रेंज