Maharashtra Jobs : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन अंतर्गत अनेक रिक्त पदांची (Recruitment) भरती होणार असून, या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पुढील प्रमाणे अर्ज करा.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. (MMRDA) येथे सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक या जागांसाठी भरती होणार आहे. तर ही भरती एकूण 21 जागांसाठी होणार आहे. पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे.

दरम्यान, या नोकरीसाठीचे ठिकाण हे मुंबई आहे तर यासाठी अर्ज हा ई-मेलद्वारे करावा. अर्जदाराने पुढील ई-मेल आयडीवर आपले अर्ज पाठवावेत.
i. Assistant Manager (Civil) : recruitment.amcivil@mmmocl.co.in
ii. Senior Section Engineer (Civil) : recruitment.ssecivil@mmmocl.co.in
iii. Section Engineer (Civil) : recruitment.secivil@mmmocl.co.in
iv. Store Supervisor : recruitment.stsup@mmmocl.co.in
v. Station Manager : recruitment.sm@mmmocl.co.in
vi. Chief Traffic Controller : recruitment.ctc@mmmocl.co.in
vii. Senior Section Engineer (E&M) : recruitment.sseenm@mmmocl.co.in
viii. Section Engineer (E&M) : recruitment.seenm@mmmocl.co.in
ix. Senior Section Engineer (IT) : recruitment.sseit@mmmocl.co.in
x. Section Engineer (IT) : recruitment.seit@mmmocl.co.in

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.