स्कायमेट या खासगी हवामान केंद्रानंतर आता भारतीय हवामान विभागानंही आपला मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात लांब पल्ल्याचा हा अंदाज वर्तविण्याच येतो.
यानुसार यावर्षी महाराष्ट्रासाठी समाधानकारक बातमी आहे. राज्यात वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आयएमडीने वर्तविलेल्या अंदाजानुसार २०२२ च्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे.
म्हणजेच यंदा सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी मात्र स्कायमेट पाठोपाठ आयएमडीनेही समाधानकारक अंदाज वर्तविला आहे. दोघांच्याही मते यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.