Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी बातमी; अरबी समुद्रात चक्रीय वादळाची स्थिती, ‘या’ भागात पुढील 7 दिवस बरसणार जोराचा पाऊस

0

Maharashtra Havaman Andaj : रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी लगबग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून यामुळे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी सात दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

खरंतर या वर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 88% एवढा पाऊस झालाय म्हणजेच 12% कमी पावसाची नोंद आहे. याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही.

विशेष म्हणजे कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. अनेक भागात कमी पावसामुळे रब्बी हंगामात पेरणी देखील होणार नाही अशी बिकट परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे.

यामुळे राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पावसासाठी देखील देव नवसला जात आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील सात दिवस पाऊस बरसत राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने महाराष्ट्रातील काही भागात पुढील सहा ते सात दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

तसेच उर्वरित महाराष्ट्रात आगामी काही दिवस ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगाळ हवामानामुळे राज्यात पुढील काही दिवस गारठा कमी जाणवेल असे देखील हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात काल अर्थातच 6 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

यामुळे राज्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून केरळ व तमिळनाडूमध्येही पाऊस आणखी वाढला आहे.

सध्या केरळ किनारपट्टीपासून ते दक्षिणपूर्व अरबी समुद्रात खालच्या व मध्यम भागात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पश्चिम- वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे.

एकंदरीत अरबी समुद्रात तयार झालेल्या या वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस पाऊस बरसणार असा अंदाज आहे. पण यंदाच्या मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस बरसला नसल्याने हा पाऊस रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो असे शेतकऱ्यांना वाटत आहे.