शिंदे सरकारची भन्नाट योजना ! राज्यातील ‘या’ मुलींना 18व्या वर्षी मिळणार 75 हजार रुपये, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करणार ?
Maharashtra Government Scheme : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापित केली. वर्तमान सरकारने सत्तेत आल्यानंतर गेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक योजनांना बंद केले. तर काही योजना नवीन स्वरूपात सुरू केल्यात.
विशेष म्हणजे काही नवीन योजना देखील वर्तमान सरकारने सुरू केल्या आहेत. वर्तमान सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. यापैकी बहुतांशी योजना आता सुरू देखील झाल्या आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय वर्तमान सरकारने घेतला आहे. याशिवाय एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. खास म्हणजे राज्यातील महिलांसाठी आणि मुलींसाठी देखील वर्तमान सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुलींसाठी एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मुलींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना राबवण्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. दरम्यान याच योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे या योजनेचा अधिकृत जीआर अर्थातच शासन निर्णय मंगळवारी 7 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे, आता या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या योजनेची अंमलबजावणी सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या योजनेबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लेक लाडकी योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, मुलगी सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तसेच मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर सुधारणे आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहित करणे हा आहे. यासोबतच मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह थांबवणे, कुपोषण कमी करणे इत्यादी उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने घेतला आहे.
कोणत्या मुलींना मिळणार लाभं
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एका कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला लाभ मिळणार आहे.
यासाठी मातापित्यांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र मात्र द्यावे लागणार आहे.
दुसरी प्रसूतीवेळी जर जुळी मुलं जन्माला आली आणि दोन्ही मुली राहिल्यात तर दोघांना आणि एक मुलगी राहिली तर तिलाही या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा किंवा एक मुलगी आहे आणि त्यानंतर दुसरी प्रसूती झाली आणि जुळी मुली जन्माला आल्या किंवा एक मुलगी जन्माला आली तर तिलाही या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
कोणकोणती कागदपत्रे लागणार ?
मुलीचा जन्म दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पालकांचे व मुलीचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक ( मुली सोबत जॉईंट खाते लागेल), मतदान ओळखपत्र ( या योजनेचा शेवटचा लाभ घेताना हे लागेल), बोनाफाईड, माता किंवा पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र, या योजनेचा शेवटचा लाभ घेताना मुलगी अविवाहित असणे आवश्यक.