Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

फिरावंसं वाटतंय ? मग सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ सुंदर पर्यटन स्थळाला एकदा अवश्य भेट द्या ! डोळ्यांचे पारणेच फिटेल

0

Maharashtra Famous Tourist Spot : महाराष्ट्राला स्वर्गापेक्षाही सुंदर सह्याद्रीचा माथा लाभला आहे. सह्याद्रीचा हा माथा राज्याची शान आहे. सह्याद्री माथ्याची सुंदरता शब्दात सांगणे जवळपास अशक्यच आहे. कारण की, सह्याद्रीची सुंदरता पाहण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जावे लागते.

खरंतर, संपूर्ण सह्याद्री माथा हा फिरण्यासारखा आहे. मात्र आज आम्ही वाचक मित्रांसाठी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर अशा पर्यटन स्थळाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. त्यामुळे जर तुम्हीही कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

कोणते आहे ते ठिकाण?

आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ज्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत जाणून घेणार आहोत ते स्थळ आहे नासिक मधील हरिहर किल्ला. खरंतर महाराष्ट्रातील 36 पैकी 36 जिल्ह्यात किल्ल्यांचे साम्राज्य आहे. प्रत्येक किल्ल्याची आपली एक अनोखी सुंदरता आहे आणि प्रत्येक किल्ल्याला काही ना काही ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. हरिहर किल्ला देखील असाच एक महत्त्वाचा किल्ला आहे.

जर तुम्ही ऑक्टोबर हिटमुळे परेशान झाला असाल आणि या वीकेंडला कुठे फिरण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या किल्ल्याला एकदा भेट देऊ शकता. विशेष म्हणजे हा किल्ला चढतांना खूपच चित्तथरारक अनुभव येतो. यामुळे येथे दुर्गप्रेमी दरवर्षी हजारोंच्या संख्यने हजेरी लावतात. या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा किल्ला जमिनीवर नसून डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे.

यामुळे या किल्ल्यावरून सह्याद्रीचे खरे दर्शन घडते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या किल्ल्याची सुंदरता पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडते. जो या किल्ल्यावर एकदा जातो तो सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याच्या प्रेमातच पडतो.

जर तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ इच्छित असाल तर हा किल्ला नाशिक आणि घोटी शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आणि इगतपुरी रोड 48 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे हे लक्षात असू द्या.