मुंबई : ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित अनेकदा तिच्या कामामुळे आणि जीवनशैलीमुळे चर्चेत असते. दरम्यान, माधुरीबाबत अजून एक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे माधुरी आता आपल्या कुटुंबासह मुंबईतील वरळी येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे. मात्र, माधुरीने हे घर विकत घेतले नसून ती या ठिकाणी भाड्याने राहणार आहे. माधुरीने या अपार्टमेंटमध्ये घेतलेल्या घराचे भाडे ऐकून तुम्हीही चकित व्हाल.
माधुरीने घेतलेल्या या घराचं भाडं इतकं आहे की त्यामध्ये एखादा मध्यम वर्गीय माणूस एक घर विकत घेऊ शकेल. माधुरी दीक्षितच्या घराचे भाडे 12 लाख रुपये प्रति महिना असल्याचे बोलले जात आहे. माधुरी दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षितने हा अपार्टमेंट पुढील 3 वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे.
सध्या आपण माधुरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर ती अलीकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘द फेम गेम’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिच्या कामाचे चाहत्यांनीच नव्हे तर समीक्षकांनीही खूप कौतुक केले आहे. माधुरी मुंबईत शिफ्ट झाली असून ती अजून काही नवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसू शकते.