मुंबई : सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. लाखो लोकांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटिंचाही समावेश आहे. यातच आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माधुरी दीक्षितने हा डान्स व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘द फेम गेम’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये रितेश आणि मधून खूपच मस्त दिसत असून यावेळी रितेशने काळ्या रंगाची कपडे घातले आहेत. तर माधुरीने चमकदार आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. यावेळी दोघांनीही ‘कच्चा बादाम गाण्यावर डान्स करताना खूप मज्जा केलेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, ‘कच्चा बादाम’ गाण्याचे सिंगर भुबन बड्याकार हे पश्चिम बंगाल येथे राहतात. त्या ठिकाणी ते शेंगदाणे विकण्याचं काम करत असतानाच ‘काचा बादाम’ हे गाणं गात असत. एका व्यक्तीनं ते गाणं गात असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आणि भुबन बड्याकार रातोरात स्टार झाले आहेत.