मुंबई : इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएल 2022 च्या मोसमातून आपले नाव मागे घेतले. मार्क वुडला मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीने 7.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता लखनऊ फ्रँचायझीने मार्क वुडची जागा शोधली आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटने ट्विट करून माहिती दिली आहे की, अँड्र्यू ट्राय मार्क वुडची जागा घेणार आहे.
IPL 2022 साठी लखनऊ सुपर जायंट्सने दुखापतग्रस्त इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या बदली अँड्र्यू ट्रायला करारबद्ध केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटीदरम्यान वुडला दुखापत झाली होती.
27 आयपीएल सामने खेळलेला आणि 40 विकेट्स घेणारा हा वेगवान गोलंदाज अँड्र्यू ट्रायला लखनऊने एक कोटी रुपये खर्चून संघात सामील केले आहे. या संघाचा पहिला सामना 28 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सशी होणार आहे.
🚨 NEWS 🚨: Andrew Tye joins Lucknow Super Giants as a replacement for injured Mark Wood. #TATAIPL
More Details 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022
बुधवारी संघाने याची अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. यापूर्वी लखनऊन सुपर जायंट्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांना बोर्डाकडून एनओसी मिळाली नाही.