मुंबई : काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल विमानतळावर स्पॉट झाले होते. रिपोर्टनुसार हे दोघे व्हेकेशनला गेले असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, नुकतेच दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधून कतरीना आणि विकी व्हेकेशनलाच गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कतरिना कैफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत विकी आणि कतरिना एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवताना दिसून येत आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघे मालदीवमध्ये एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोत कतरिनाने तेथील निसर्गाचा सुंदर असा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, विकी आणि कतरिना यांनी गेल्यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. बॉलिवूडच्या बिग फॅट वेडिंग्जपैकी हे एक लग्न होतं. या दोघांनीही लग्नाचे विधी खूपच खाजगी ठेवले होते. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. तेव्हापासून हे कपल एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

मात्र, या दोघांना लग्न झाल्यावर त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे कोठे एकत्र फिरायला जात आले नाही. दोघेही आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आपापल्या कामावर परतले होते आणि आता आपल्या संपूर्ण कामातून वेळ काढून हे कपल पहिल्यांदाच एकत्र सुट्टी एन्जॉय करायला गेले आहे.